३ महिन्यांपूर्वी savage detectives म्हणून
पुस्तक वाचलेलं. का माहित नाही पण तेव्हापासून त्यातलं एक वाक्य सतत मेंदूच्या एका
कोपऱ्यात लोळत पडलेलं होतं. या कुशीवरून त्या कुशीवर करत. अस्वस्थपणे.
Being alone makes us
stronger. That’s the honest truth. But its cold comfort, since even if I wanted
company no one will come near me anymore.
आणि आज सकाळपासून च्यायला किक बसावी सारखी
तसं हे वाक्य सारखं धडकतंय. उलटसुलट सगळ्या मेंदूतून फिरतंय. कसं थांबवावं? काय
करावं? काही तरी निरुपद्रवी वाचत बसावं का? की लिहीत सुटावं इन जनरल दाखवू शकत असलेल्या
दु:खांवर. दाखवू शकत असलेली दु:खं. च्यायला लिहिताना पण गांडूपण सुटत नाही काही
केल्या. नखशिखांत नागडं होऊन लिहायला केव्हा जमणार काय माहित.
वयापलीकडे विचार जात नाहीत
आणि विचारांपलीकडे इच्छा
तोवर सगळं ठीक
ते नाही जमलं की मग अशक्य लागते
कारण इच्छांच्या सभोवताली
निमुळत्या होत जाणाऱ्या
दऱ्या असतात
खोल
आणि इच्छांचं टोक ताठ होऊन
टोचत सुटलं
की कोसळणं आलंच
मग कुठल्या तरी दगडावर आपटून
भळभळणं पण अटळ च्यायला
जोवर येतोय तोल सांभाळता
तोवर करावा प्रयत्न आपला आपण
अर्थात तरी प्रयत्नांती दगडच
हे लक्षात आलं ना
की मग फैजला बाजूला काढून टाकावं डोक्यातून
राहते और भी है वस्ल की राहत के सिवा
हे खरं असेलही
पण ते कोसळायच्या आधी आणि नंतर
कोसळतानाची राहत ही वेगळीच
हव्या त्या ठिकाणी असेल तर अजून वेगळी
बाकी सगळीकडे फक्त
कोल्ड कंफर्ट
हे असं वाक्य मधेच तोडून, क्रियापदं मध्ये वगैरे टाकून दोन-तीन ओळीत लिहिली की कविता वगैरे लिहिलीय असं वाटू शकतं कुणाला. पण नाहीये ही कविता. कविता लिहून जमाना झाला च्यायला. आता फक्त तुकडे. वाक्यांचे, शब्दांचे, अक्षरांचे आणि अर्थांचे पण.
आणि विचारांपलीकडे इच्छा
तोवर सगळं ठीक
ते नाही जमलं की मग अशक्य लागते
कारण इच्छांच्या सभोवताली
निमुळत्या होत जाणाऱ्या
दऱ्या असतात
खोल
आणि इच्छांचं टोक ताठ होऊन
टोचत सुटलं
की कोसळणं आलंच
मग कुठल्या तरी दगडावर आपटून
भळभळणं पण अटळ च्यायला
जोवर येतोय तोल सांभाळता
तोवर करावा प्रयत्न आपला आपण
अर्थात तरी प्रयत्नांती दगडच
हे लक्षात आलं ना
की मग फैजला बाजूला काढून टाकावं डोक्यातून
राहते और भी है वस्ल की राहत के सिवा
हे खरं असेलही
पण ते कोसळायच्या आधी आणि नंतर
कोसळतानाची राहत ही वेगळीच
हव्या त्या ठिकाणी असेल तर अजून वेगळी
बाकी सगळीकडे फक्त
कोल्ड कंफर्ट
हे असं वाक्य मधेच तोडून, क्रियापदं मध्ये वगैरे टाकून दोन-तीन ओळीत लिहिली की कविता वगैरे लिहिलीय असं वाटू शकतं कुणाला. पण नाहीये ही कविता. कविता लिहून जमाना झाला च्यायला. आता फक्त तुकडे. वाक्यांचे, शब्दांचे, अक्षरांचे आणि अर्थांचे पण.
कुणी निराळा म्हणतात कुणी विक्षिप्त
रे कसे व्हायचे कोणापाशी व्यक्त
आयुष्याला ना कुठे परिघ ना व्यास
नुसताच घ्यायचा सोडायाचा श्वास
रे कसे व्हायचे कोणापाशी व्यक्त
आयुष्याला ना कुठे परिघ ना व्यास
नुसताच घ्यायचा सोडायाचा श्वास
हा एक फुफ्फुसाच्या आत रुतून बसलेला फार फार जुना
तुकडा. आणि असे अनेक आणखी. असंख्य तुकडे.
तरी हे तुकडे बरेच. तुकड्या तुकड्यांनी भेटणारी
माणसं मात्र या तुकड्यांपेक्षा जास्त वाईट. आनंद तर नाहीच. उलट आणखी नवीन
तुकड्यांची भर. कोल्ड कंफर्ट च्यायला.
जाऊ दे. बेगम अख्तर गुणगुणायला लागलीये आता बॅकग्राऊंडला.
ये देखना है सुकूँ अब कहाँ से मिलता है
मिळेल तेव्हा मिळेल.
तोपर्यंत तुकड्या तुकड्यांनाच आपलं म्हणत रहायचं.
0 comments:
Post a Comment