आज
काहीतरी शोधताना जुनी डायरी सापडली. त्यात शेवटून दुसऱ्या पानावर
ही कविता. कविता नाही फक्त ट ला ट.
Hunger Lining
आलिशान हॉटेलात बसून
welfare economics च्या
चर्चा करणारी मंडळी
acidity होईल म्हणून
ताटातलं अर्ध अन्न
तसंच शिल्लक ठेवतात...
आणि hunger indexच्या
आकडेवारीच्या कागदावर
कालचा शिळा भात आणि
उरलेली डाळ कालवत
रस्त्यावरची अर्धपोटी पोरं
आनंदाने जेवतात...
३० डिसेंबर,२०११
तेव्हा नुकतंच
लाल शाईचं फौंटन पेन घेतलं होतं, त्याने लिहिलेली. तेव्हा काही महिने फार वापरली लाल शाई. आता काळी किंवा निळीच वापरतो. अर्थात
कुठल्याच रंगाने तसा काही फार फरक पडत नाही. अक्षर जसं यायचं तसंच येतं. विचार मात्र बदलू शकतात कदाचित. असो. त्यावेळेस कुठलं तरी poverty वरचं पुस्तक
वाचलेलं, म्हणून लिहिली असावी. कुठलं पुस्तक तेही आता आठवत नाही च्यायला. तसंही
पुस्तकाच्या पानांमधून गरिबी समजून घेणं ही चुत्येगिरीच. आणि त्यावरून ट ला ट जुळवत बसणं ही आणखीन मोठी
चुत्येगिरी. असो.
नुकतंच एक मैत्रीण म्हणाली तू इतक्या शिव्या देत जाऊ
नकोस, फार बरं नाही दिसत ते म्हणून. तर मी म्हटलं बरं. पण खरं तर तिने असं
म्हटल्यावर एकदम हुतुतूतले आदी(सुनील शेट्टी) आणि पन्ना(तबू) आठवले.
आदी – गाली मत दिया कर यार. तेरे मूंह से अच्छी नही लगती.
पन्ना – क्यों किस करता है तो बास आती है क्या?
... तो तू सिगरेट छोड दे.
आदी - ... अच्छा एक बात बता ये सिगरेट पेहले आयी या
करप्शन?
पन्ना – सिगरेट.
आदी – कैसे?
पन्ना – सिगरेट में नशा है. नशेमें power है. Power में करप्शन.
च्यायला हे खरं लॉजिक. नाहीतर mathsमध्ये शिकवतात ती नुसती भंकस.
तिला विचारणार होतो तू हुतुतू पाहीलायस का? पण म्हटलं
जाऊ देत च्यायला. नसेल पाहिला तर बरंच आहे. असले उदास करणारे सिनेमे खरं तर
सेन्सॉर बोर्डाने येऊच नाही दिले पाहिजेत. पण आपलं सेन्सॉर बोर्ड येडझवं आहे. छान
इंद्रियं चाळवणारे सिनेमे नको तेवढं कापतं आणि असले उदास करणारे सिनेमे मात्र येऊ
देतं.
च्यायला परत शिवी! मी आता एक नियम बनवणारेय की किमान १०
वाक्यांच्या मध्ये एकही शिवी लिहायची नाही. मग हे जमलं की २० वाक्यं. मग ३०.. ५०..
१००.. १०००.. १००००.. १ लाख.. १ कोटी.. १ अब्ज..
भेन्च्योद. इतकं कोण लिहिणार?
पण हुतुतूतला आदीचा एक dialogue मात्र मला फार आणि केव्हाही आठवत राहतो.
‘इन हंडीयो में सवाल बहोत उबलते है. ठीक कहते है वो, इस जनरेशन के पास सवाल बहोत है,
जवाब कोई नही. जियो तो इस जहर भरे, करप्शन भरे माहोल में या फिर मर जाओ. साफ सुधरी
हवा खाने के लिए जाएंगे भी तो कहा? पैसा, रुपया, आराम – आराम है मुझे? मेरा तो दम
घुट रहा है. बस जी रहा हूं. जैसे कोई वक्त पुरा कर रहा हूं --- ’
च्यायला प्रत्येक वर्ष संपताना ही जाणीव अधिकाधिक तीव्र का होत जाते? कुठेही असलो, कुणाबरोबरही असलो तरी डोक्यात हेच..
बस जी रहा हूं. जैसे कोई वक्त पुरा कर रहा हूं ---
जाऊ देत पण हा विषय. जाऊच दे च्यायला---
विषय. वर्ष. आणि विष.
तिन्हीत व आणि पोटफोड्या ष कॉमन. आणि तीनही पचवणं जाम
जाम अवघड.
तर विषय त्यातल्या त्यात बरा.
कारण तो बदलता तरी येतो. वर्ष तर बदलत राहतातच. नकळत. आणि विष बदलून काय उपयोग?
असो.
डायरीच्या सुरुवातीला ग्रेसच्या चंद्रमाधवीचे प्रदेश
मधल्या कविता लिहिलेल्या. तेव्हा लायब्ररी लावलेली आणि दर महिन्याला पैसे लागतात म्हणून केवढी तरी
पुस्तकं वाचायचो. आवडलं काही की जागून डायरीत उतरवून काढायचो. आता पुस्तकं विकत
घेतो आणि कपाटात ठेवून देतो. तर ही फालतुगिरीच. तर त्यात ही कविता सापडली –
जे सोसत नाही असले
तू दु:ख मला का द्यावे
परदेशी अपुल्याघरचे
माणूस जसे भेटावे
मिटल्यावर डोळे मजला
स्मरतात निरंतर नाद
हाकांना मागावे का
त्यांचेच जुने पडसाद?
पडवीच्या देखाव्यातून
दिसतात मनाचे खांब
क्षितिजाच्या जवळी जाता
ते पुन्हा पसरते लांब ---
फार फार फार भयंकर कविता आहे ही. ऐकली की कुठे तरी
भलतीकडेच नेऊन सोडते. भलतीकडे तरी ओळखीच्या ठिकाणी. जिथे बाजूला समुद्र वगैरे
असतो. बेक्कार खवळलेला. लाटांचा आवाज. एखाद्या ओळखीच्या लयीत. आणि मग समोर तू.
“आता अचानक भेटलोच आहोत
तर थोडे मनसोक्त तरी भेटू.”
“थोडे आणि मनसोक्त?
तस्साच आहेस बघ अजून.”
“दाढी वाढलीये ना पण.”
“उपयोग काय त्याचा. दाढी
नाही, दाढ वाढायला हवी. अक्कल दाढ.”
“आलीये हां तीसुद्धा.
बरीच वर्षं झाली आता.”
“(समुद्राकडे पाठ करून)
हो बरीच वर्षं झाली. केवढा बारीक झालायस आणि. नीट जेवत जा बघू. आणि पुस्तकं थोडी
कमी वाचत जा किंवा बेस्ट म्हणजे वाचूच नकोस. वर्षभर तरी.”
“हो.”
“समुद्राकडे नाही, माझ्याकडे बघून सांग.”
“हो गं.”
“आणि लिहितोस का अजूनही?”
“हो थोडं फार. आणि तू?”
“नाही.”
“का?”
-----
बस्स. इतकंच.
मग पुन्हा लाटांचा आवाज. प्रचंड. फार फार जीवघेण्या लयीत.
च्यायला अर्धवट राहिलेल्या भेटी फार फार छळतात.
स्वप्नातल्यासुद्धा! असो.
एक दिवस ना मी NCPAवरून समुद्राच्या कडेकडेने चालत जायचं ठरवलंय. बघू तू
भेटतेयस का ते...
तुझ्यात अरण्य, मला सापडावे
माझे मीच व्हावे, अश्वत्थामा |
फिरताना आणि होता तुझी भेट
हृदयात थेट, जावी कळ |
जाऊ देत च्यायला. When you
have finished with others, that is my time.
मी आता शहाण्या मुला सारखा हाताची घडी आणि तोंडावर बोट
ठेवून बसणारे.. मरेपर्यंत!
च्यायला मरेपर्यंत काय?
तर मी हे लिहिणार नव्हतो. म्हणजे असं काही मी कधी बोलतसुद्धा
नाही. पण ते नुकतीच अमृता आणि इमरोझची पत्रं वाचतोय म्हणून इतकं पाणचट लिहिलं असावं.
तरी बरं ग्रेस एवढाच कळतो ते. अज्ञानात सुख असतं(?) असं म्हणतातसुद्धा. असो.
त्यापुढे मग पाब्लो नेरुदाची एक कविता.
I can write the saddest
lines tonight
I loved her, she loved me
too.
मला का माहीत नाही पण नेहमी या ओळींबरोबर १९८४ मधल्या पण
ओळी आठवतात
Under a spreading
chestnut tree
I sold you, you sold
me.
आणि मग कमालीची उदास होते. मग उगाच जुनं सगळं चालू होतं डोक्यात. असं झालं असतं तर किंवा, तसं झालं असतं तर वगैरे.
मग ते ‘पण लक्षात कोण घेतो’च्या शेवटी असलेलं वाक्य
Of all sad words
of tongue or pen,the saddest are
these, 'It might have been.’म्हणून मला तुझा पाब्लो आवडत नाही.
तो वाचल्यावर अपोआप लिहिल्या जातात saddest
lines.
पण मग कधी कधी वाटतं की हे असं लिहिणं हे खरं तर तितकंसं वाईट नाहीये. इतर कुणाला वाटत असेल काय काय. पण
मला मात्र आवडतं हे. कदाचित हे मीच माझी माझी समजूत घालणंही असेल. पण तरी त्यानिमित्ताने
तुझी आठवण येत राहते. मी जगत असतो पुन्हा पुन्हा तुला. भेटत असतो तुला. बोलत असतो
तुझ्याशी.
एक मित्र म्हणाला मध्ये, तू विपश्यनेंला जा म्हणून. विपश्यना
का करतात माणसं? विचार घालवायला? छे मला हाच विचार सहन नाही होत. मला तुझा विचार
करून कंटाळा किंवा डिप्रेशन नाही येत. I don’t feel hurt when I think of you. उलट खूप मस्त वाटतं. तू मला
केवढ्या गोष्टी शिकवल्यास. प्रेम ओळखायला, प्रेम करायला. सर्वांवर. स्वत:वर सर्वात
जास्त. तू भेटण्याआधी केवढे न्यूनगंड होते माझे माझे. तुझ्या सोबत राहिल्यावर सगळे
गळून पडले एक एक करून. आता परतलेत बरेच. पण तरी मी प्रेम करणं नाही थांबवलं. कुणाशीही
बोलताना, भेटताना मी शोधत बसतो तुला. कुणाची हनुवटी, कुणाचे केस, कुणाचा स्वभाव,
कुणाचं बोलणं आणि काय काय. तुझी जराशी जरी झलक सापडली की मी प्रेमात पडतो
त्यांच्याही. म्हणजे खरं तर तुझ्याच. पुन्हा. नव्याने. सोसलेला, पाहिलेला, जगलेला
सगळा कडवटपणा नाहीसा होऊन जातो मग. तुला अमृता आवडायची ना. मला फक्त तिच्या या ओळी
आवडतात. मनापासून.
नजर के आसमान से
सुरज कहीं दूर चला गया
पर अब भी चांद में
उसकी खुशबू आ रही है
तेरे इश्क की एक बूंद
इस में मिल गई थी
इस लिए मैने उम्र की
सारी कडवाहट पी ली...
किरण नगरकरांची मध्ये एक मुलाखत वाचली. त्यात ते
म्हणतात, एखादी व्यक्ती बेपत्ता झाली म्हणून आपण तिच्याशी बोलणं थोडंच थांबवतो?
कित्ती खरंय हे. मला हे वाचून तुझी इतकी आठवण आली म्हणून सांगू. मी आजही तुझ्याशी
इतकं बोलत असतो. सतत. आणि आता फोनच्या बिलाची काळजीसुद्धा नाही करावी लागत. तुला
आठवतंय आपण अगदी सुरुवाती सुरुवातीला भेटलेलो आणि मिसळ खायला म्हणून एका टेबलवर
बसलो होतो. कॅंटीनमध्ये. तू माझाच चमचा घेतलास. आणि मी अजून एक चमचा घेऊन आलो तू
उष्टा केलास म्हणून. म्याड होतो न मी केवढा. नंतर २ महिन्यातच तुझ्या रूमवर आपण मॅगी
खाल्लेली. एकाच टोपात. बोटांनी. एकमेकांच्या. मी दिवसभर उपाशी असलो आणि रात्री
तरीही जेवणाचा कंटाळा आला की अजूनही करतो मॅगी. आणि तसच बोटानीच खातो. पोट भरत नाही.
पण मन भरून जातं एकदम.
तुला शाहीद कपूर आवडायचा म्हणून मी मॅडसारखा आजसुद्धा त्याचा प्रत्येक चित्रपट
बघतो. मला तो मुळीच आवडत नसूनही. फर्स्ट डे, फर्स्ट शो. दोन तिकिटं काढून!
परवा इराण्याच्या हॉटेलात मैत्रिणीसोबत बसलेलो असताना, तिच्या हातावर एकदम लांबलचक
मेंदी पाहिली आणि उगाच तुझी आठवण आली. भयंकर. मग तिच्याशी बोलताना अख्खा वेळ
बॅकग्राऊंडला ही कविता.
तू डोके मांडीवरती
ठेवून
दीर्घ बिलगावे
अन्
खोल अंतराळात
ध्रुवाचे
तुकडे व्हावे
तुकड्यांना
जमवित असता
बुबुळांत
शिरावी नीज
अडकावा
चंद्र गळ्याशी
हृदयात
भरावी वीज
वीजेने
तुटला थेंब
पसरावा
फरशीवरती
मेंदीभरल्या
बोटांनी
रोखावी
नकळत भरती
भरतीच्या
वेळी तूही
लाटांचा
घेत निरोप
दारातिल
उचलुन न्यावे
तुळशीचे
हिरवे रोप...
मला ही कविता कित्ती आवडते तुला माहितीये. लोकांना उगाच
उदासवाणी वगैरे वाटते. मला नाही वाटत तसं. तुला आठवतंय आपण एकदा रात्री बसने जात
होतो, थंडीच्या दिवसात. आणि तू माझं जॅकेट घातलं होतंस. मी इतकी वर्षं झाली तरी
अजून वापरतो ते. विरलंय आता थोडं. बाईकवरून जाताना रात्रीचा गार वारा हळूच शिरत
राहतो सारखा त्यातून.
पण तरीही मला अगदी मस्त वाटत राहतं. उबदार एकदम. आठवणींमध्ये केवढी ऊब असते ना...
त्यांचा त्रास कसा होईल?
Infact तुझी आठवण मला शांत करते, माणसांत परत आणते. तुझ्या विचारांचा त्रास नाही
होत. बघ तुझा उल्लेख आल्यापासून एकही शिवी नाही लिहिली इथे. कदाचित इतकी वर्षं
झालीत म्हणून असेल किंवा कदाचित मी बऱ्यापैकी mature वगैरे झालो असेन(!) आता
म्हणूनही. पण आठवणीचा त्रास नाही होत. त्रास जे पुढ्यात वाढलंय ना त्याचा होतो. नाही
पचत. नाही रुचत. बदलताही येत नाही. म्हणून सगळा त्रास. त्यात मला ही अशी दिवस दिवस
उपाशी राहायची सवय. कितीही अजीर्ण झालं, नॉशिअस वाटलं तरी पुढ्यात जे वाढलंय ते
संपवायचंच. हा च आवडत नाही बघ मला. हे असं जबरदस्तीने ताट संपवणं मी लहानपणीसुद्धा
केलं नव्हतं. मागे ८वीत असताना एका मित्राच्या घरी गेलेलो, तर त्याच्या बाबांनी
पुढ्यातला चिवडा नको म्हटलं तरी संपवायला लावला होता. तेव्हापासून मी त्याच्या घरी
परत गेलोच नाही. पण इथे तसं नाही करता येत, म्हणून मग त्रास.
च्यायला, हे पुढ्यात वाढलेलं ताट संपवण्याला पर्याय नाही.
नाहीच मुळी. मग तुम्ही विपश्यनेला जा, देवळात-मशिदीत-चर्चमध्ये जा, कीर्तन करा,
पोथ्या वाचा, पुस्तकं वाचा, कविता लिहा, नाटकाला, सिनेमाला जा, समुद्रावर जा,
पर्वतांवर जा, माणसांत फिरा, नाहीतर गुहांमध्ये राहा, मरेपर्यंत काम करा किंवा
रीकामचोट पडून राहा, लग्न करा/करू नका, पोरं काढा/काढू नका, संन्यास घ्या, प्रेम
करा, लफडी करा, सेक्स करा, हस्तमैथुन करा, दारू प्या, सिगरेट ओढा, जॉइंट मारा,
कामाठीपुऱ्यात जा, पोरींसोबत झोपा- ५० वर्षाच्या,३० वर्षाच्या, १६ वर्षाच्या, १०
वर्षाच्या किंवा गर्भाशयातल्या, ते नाही पुरलं तर पोरांसोबत झोपा, मग हिजड्यानसोबत
पण झोपा, नाही तर मग प्रेतांसोबत झोपा, दुर्लक्ष करा, शिव्या घाला. काहीही करा. पण
हे लक्षात असू दे - पर्याय नाही म्हणजे नाहीच.
The only way out is through.
च्यायला हे Robert frost ने आधीच
लिहून ठेवलंय. कवी होता ना साला. कुठल्या ना कुठल्या पॉईंटला लक्षात आलंच असेल
त्याच्याही.
जगायची पण सक्ती आहे
मरायची पण सक्ती आहे
बघ तुझी आठवण बाजूला काढली की काय काय बाहेर पडतं ते. जाऊ
देत पण. प्रत्येक वर्षं संपताना हे असं होत राहातंच. रोज मरे त्याला कोण... १०
वर्षांपूर्वी बरोब्बर ३१स्ट डिसेंबरलाच एक गाणं ऐकलेलं. नादा सर्फ या माणसाचं. Blankest year म्हणून. फार
फार आवडतं मला ते.
Oh, fuck it
I’m gonna
have a party
I had the blankest year
I saw life turn into
a T.V. show
It was totally weird
The person I knew I didn’t really know
Time don’t move
We’re the only
ones who do
Bending reason
Cause its all we hold on to
Oh, fuck it (fuck it)
I’m gonna
have a party
Oh, fuck it (fuck it)
I’m gonna
have a party
तेव्हापासून दर ३१स्टला हे गाणं
ऐकतो मी. कुठेही असलो तरी.
लावून बोचरे हळवेसे संगीत
ठेवतो स्वत:ला दिवसरात्र गुंगीत
रोखावा अलगद श्वास गळा दाबून
तशी सर्व मनाला मारत जाते धून
मरो च्यायला. मरोच.
पुढल्या वर्षीसाठी मी संकल्प करणारे
– काही म्हणजे काहीच वाचायचं नाही. लिहायचंही नाही. कवितापण नाही. कुण्णाकुणाला
भेटायचं नाही. फक्त फिरायचं. NCPAपासून.
चालत चालत. समुद्राच्या कडेकडेने. समुद्र नेईल तिथे तिथे...