Thursday, August 11, 2011

३ मार्च, २००९

आज विद्याविहार स्टेशनवरून पायरया उतरताना बाजूने चालणारया माणसाच्या पायावर पाय पडला. तो साधी कोल्हापुरी चप्पल घालून आणि माझे चांगले किलोभर वजनाचे स्पोर्टस् शूज. पाय पडल्या पडल्या लगेच एकदम कळवळला तो माणूस. मी 'सॉरी' बोलायला जाणार, त्या आधीच काही झालंच नसल्याप्रमाणे तो डाव्या बाजूने शांतपणे पुन्हा पायरया उतरू लागला. राग, चीड असलं काहीच नव्हतं त्याच्या चेहरयावर. आणि 'सॉरी' बोलताच नाही आलं. म्हणजे असं कोरडं 'सॉरी' बोलण्याला काही अर्थच नव्हता. मग कॉलेजला जाता जाता डोकं एकदम गच्च होऊन गेलं म्हणजे एखाद्या माणसात इतकी सहनशक्ती कुठून येते? मी त्याच्या जागी असतो तर असा वागलो असतो का? नकळत का होईना, पण एखादी तरी शिवी आलीच असती जीभेवर, आणि कदाचित तो इसम पुढे गेल्यावर दिलीसुद्धा असती. माझ्यात इतकी सहनशक्ती कधी येईल? किंवा कधीतरी येईल का?
बरं आता हे लिहिताना आणखी एक वाटतंय की, खरंच मी इतक्या घाईघाईने का चाललो होतो? कॉलेज सुरू व्हायला चांगला अर्धा तास तरी शिल्लक होता, मग मी असं धावत का होतो? की फक्त सवय झालीय म्हणूनच धावत होतो? धावताना काय तुडवलं जातं याचा विचार करायचाच नाही का? धावणं गरजेचं आहे का? असो. मरो. मरोच च्यायला.

4 comments:

विक्रम वालावलकर. said...

अरे वा. आपल्याला शिवी द्यायला आवडते म्हणून दिली असती. खरंतर शिवी देऊन पायाला मुळीच बरं वाटणार नसतं, पण आपल्याला जाम बरं वाटतं..च्यामायला!
आणि कुणी सांगावं त्याने मनातल्या मनात लाखोली वाहिलीही असेल.. तू तरुण..लफडा करशील, उगाच कशाला ओढवून घ्या, म्हणून नसेल गेला मोठ्याने उच्चारायला!!!

शतानंद said...

हा हा मी लफडा करेन असं वाटणं पण अशक्यच. तर असो.

Asita Ajgaonkar said...

sahanshakti garibitun yete!rojachya jaganyachach etaka bhar asato ki asha chhotya goshti mothya watat nahit!

शतानंद said...

tech.. generally loka ha bhar halka vhava mhanun ulat wagtat agadi yachya.. aso.

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!