Sunday, July 31, 2011

राजे

तोंड भरून कौतुकास्तव भेटले कित्येक जिवाभावाचे
ओळखी अनोळखी चेहरे भोवती पोरींचे थवे
विचारतात भलभलते कवितेचे नकोते माझे
आवडल्या कविता माझे हस्ताक्षर कुणाला काय द्यावे

एक चिमणी गोडी पोर नुसतीच हसत आली
आणि माझ्या हिन्दोळ्याला झोका देऊन गेली
"एकदा तिकडे पुण्याकडे जरूर जरूर जरूर या
(कविता नकोय ), राजे, फक्त तुमचे डोळे देऊन जा"

ना. धो. महानोर

4 comments:

विक्रम वालावलकर. said...

नेत्रदान:महान दान!
ती नेत्रदान संस्थेची कार्यकर्ती असणार नक्की.

शतानंद said...

साला नेत्रदान म्हणे.. अरसिक!

Asita Ajgaonkar said...

barobar ahe pan vikramacha!:D

शतानंद said...

Eka maleche mani..

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!